नायलॉन मांज्यामध्ये अडकलेल्या घुबडाची सुटका
दिनांक 05/05/2025 रोजी प्रादेशिक कार्यालयाच्या आवारातील वृक्षावर नायलॉन मांज्यामध्ये घुबड (Owl) पक्षी अडकलेला असल्याचे प्रादेशिक कार्यालयातील च.श्रे. कर्मचारी श्रीमती. मनीषा सहाणे यांच्या दर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर ची बाब श्री. अनिल नागरे यांचे लक्ष्यात आणून दिली, त्यांनी त्वरीत अग्नीशामक दलास संपर्क साधला. अग्नीशामक दलाने तात्काळ प्रतिसाद देऊन त्यांनी कौशल्यपुर्वक घुबड पक्षास नायलॉन मांज्यातुन सोडविले व तात्काळ पशुवैद्यकीय दवाखन्यात नेऊन् त्याच्यावर उपचार केले.




