लाड पागे समिती

अक्र
1 दि 0८-१२-१९९७ सफाई कर्मचारी करिता राज्य स्तरीय आयोगाची रचना सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवा, कल्याण व समस्यांवर अभ्यास करून शासनाला शिफारसी करण्यासाठी राज्यस्तरीय सफाई कर्मचारी आयोगाची स्थापना करण्यात आली.
2 सा प्र वि शा परिपत्रक क्र बी सी सी २००२ /१९५२/प्र कर ६५ २००२ /१६-ब दि ०१/१०/२००३ महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने सन १९९८-९९ च्या अहवालावरील शिफारशीबाबत महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाच्या 1998-99 अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.
3 नगर विकास विभाग दि 11/08/2006 लाड पागे समितीच्या शिफारसी नुसार वारसा हक्क लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले.
4 ग्रामविकास परिपत्रक क्र पदनि-१९०९/ प्र क्र ३६२/ आस्था १०/ दि १८/०४/२०११ जिल्हा परिषदेतर्गत अर्धवेळ सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना विनाअट सेवेत सामावून घेण्याबाबत जिल्हा परिषदेत अर्धवेळ सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनाअट नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या.
5 सा- न्या व विशेष सहय्य विभाग शा परिपत्रक क्र सफाई-२०११/प्र क्र ३२५ / दि २१/१०/२०११ लाड पागे समितीच्या शिफारसी नुसार वारसा हक्काच्या अंमलबजावणी साठी लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार वारसा हक्काने नियुक्ती प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात आली.
6 सा- न्या व विशेष सहय्य विभाग शा परिपत्रक क्र सफाई-२०१४/प्र क्र ०७ /महामंडळे दि २६/०२/२०१४ लाड पागे समितीच्या शिफारसी नुसार वारसा हक्काच्या अंमलबजावणी साठी वारसा हक्क अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना व स्पष्टीकरण देण्यात आले.
7 सा- न्या व विशेष सहय्य विभाग शा परिपत्रक क्र सफाई-२०१५/प्र क्र २६८ /महामंडळे दि १०/११/२०१५ सफाई कामगाराच्या / कर्मचाऱ्याच्या वारसास वारसा पद्धतीने नेमणूक देण्याची कार्यपद्धती यापुढे सुरु ठेवण्याबाबत सफाई कामगार/कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा पद्धतीने नियुक्ती देण्याची विद्यमान कार्यपद्धती पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
8 सान्याव वी सहावि शा नि क्र सफाई२०१५/ प्र क्र २६८ / महामंडळे दि ०२/०२/२०१६ सफाई कामगाराच्या/ कर्मचाऱ्याच्या वारसास वारसा पद्धतीने नेमणूक देण्याची कार्यपद्धतीबाबतच्या शासन निर्णयात सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणे बाबत वारसा नियुक्तीबाबतच्या शासन निर्णयात आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी समिती गठीत करण्यात आली.
9 सा- न्या व विशेष सहय्य विभाग शा परिपत्रक क्र सफाई-२०१५/प्र क्र २६८ /महामंडळे दि ११/०३/२०१६ लाड पागे समितीच्या शिफारसी नुसार सफाई कामगाराच्या नियुक्ती बाबत वारसा हक्काच्या अंमलबजावणी पुढे चालू ठेवण्या बाबत समितीच्या अंतिम निर्णयापर्यंत सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्तीची अंमलबजावणी पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
10 महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः सफाई २०१७/प्र.क्र.१३६/आरोग्य-३
तारीख: ०७ डिसेंबर, २०१७
सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काची अंमलबजावणी पुढे चालू ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागातील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काची नियुक्ती देण्याची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली.
11 सा प्र वि शा परिपत्रक क्र बी सी सी २०१८ /प्र कर २७ /१६-ब (सी ) दि १९/०४/२०१८ लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार शासनाने वेलोवेळी दिलेल्या शासननिर्णय / शासन परिपत्रकातील सुचानाची काटेकोर पणे अमलबजावणी करनेबाबत लाड-पागे समितीच्या शिफारशींवरील सर्व शासन निर्णय/परिपत्रकांचे काटेकोर पालन करण्याबाबत सर्व विभागांना निर्देश देण्यात आले.
12 सा प्र वि शा परिपत्रक क्र बी सी सी २०१८ /प्र कर ४६ / दि 2४ /०२ /२०२३ लाड समितीच्या शिफारसी च्या अनुषंगाने सफाई कामगाराच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणी सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्तीसाठी सुधारित निकष, पात्रता अटी व कार्यपद्धती नव्याने निर्धारित करण्यात आली.
13 – सफाई २०२३/प्र क्र.४७/सआक, दिनांक :- ७ ऑगस्ट, २०२३. लाड समितीच्या शिफारशीनुसार निर्गमित झालेल्या दिनांक २४/२/२०२३ च्या सुधारीत शासन निर्णयातील मुहयांच्या अनुषंगाने मार्गदर्शन. दिनांक 24-02-2023 च्या सुधारित शासन निर्णयातील तरतुदींबाबत स्पष्टीकरण व अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन देण्यात आले.
14 महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक :- सफाई-२०२४/प्र.क्र.७०/सआक, दिनांक :- १३ ऑक्टोबर, २०२४. लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत दि.२४.०२.२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहीत सुधारीत तरतुदी दि.२४.०२.२०२३ पूर्वीच्या प्रलंबित प्रकरणांना लागू करणेबाबत… 24-02-2023 पूर्वी प्रलंबित असलेल्या वारसा हक्क प्रकरणांनाही सुधारित तरतुदी लागू करण्याबाबत शासनाने स्पष्टता दिली.
15 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय दि:- १८ -०१ २०२५ लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत दि.२४.०२.२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहीत सुधारीत तरतुदीबाबत मा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही