PM SETU “INDUSTRY MEET 2026 “

नाशिकमध्ये ‘पीएम सेतू उद्योग मेळावा – २०२६’  संपन्न

दि. २१.१०.२०२६ रोजी कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने हॉटेल रेडीसन ब्ल्यू,  नाशिक येथे ‘पीएम सेतू उद्योग मेळाव्याचे ‘  आयोजन करण्यात आले.  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत सहसंचालक, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय , नाशिक यांच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात होता. उद्योग क्षेत्र आणि कौशल्य विकास यांच्यातील समन्वय वाढविणे, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे तसेच उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या मेळाव्याच्या माध्यमातून कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. या मेळाव्यास मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे, मा. संचालक सतीश सूर्यवंशी, प्रादेशिक कार्यालय नाशिकचे मा. सहसंचालक अनिल गवित, मा. उपसंचालक रमण पाटील, मा. उपसंचालक रवींद्र मुंडासे, मा. उपसंचालक राजेश मानकर  आणि नाशिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष  मा. आशिष नहार यांच्यासह ३० हून अधिक प्रमुख उद्योगसमूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मेळाव्याचे प्रास्ताविक करताना सहसंचालक अनिल गवित यांनी पीएम-सेतू योजनेची उद्दिष्टे, अंमलबजावणी आणि उद्योगांसाठी उपलब्ध संधींची माहिती दिली.