राहुल देशमुख M.B.A., B.E. (Mech)
प्राचार्यांचा संदेश
सप्रेम नमस्कार!
आपल्या सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, दादासाहेब फाळके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर , जिल्हा नाशिक ही संस्था दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी
कटिबद्ध आहे. आमच्या संस्थेत विविध औद्योगिक क्षेत्रांतील अभ्यासक्रम उपलब्ध असून, येथील प्रशिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविणे आणि त्यांना रोजगारक्षम कौशल्यांनी सुसज्ज करणे हे आहे.
संस्थेची भौगोलिक स्थिती जरी दुर्गम भागात असली, तरी येथे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षक, आधुनिक यंत्रसामग्री, तसेच रोजगाराभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते. प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी विविध सरकारी, खाजगी व स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये यशस्वीपणे आपले स्थान मिळवत आहेत.
सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी संस्थेबाबत सकारात्मक दृष्टी ठेवून, आपल्या पाल्यांना या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. हे प्रशिक्षण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक ठोस पाऊल ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे.
आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
[:]
संदीप युनिव्हर्सिटी व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्रंबकेश्वर यांच्यात ५ वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार (MOU) यशस्वीरीत्या स्वाक्षरीत करण्यात आला.
या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश म्हणजे विविध व्यवसायातील विद्यार्थ्यांना प्रगत (ॲडव्हान्स) प्रयोगशाळांमध्ये जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य, औद्योगिक अनुभव व रोजगारक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.हा महत्त्वपूर्ण करार करण्यासाठी
🔹 प्राचार्य श्री. आर. आर. देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
🔹 डॉ. विशाल सुलाखे (HOD – Mechanical, SOET) यांनीही योग्य दिशा व मार्गदर्शन दिले.
🔹 तसेच MOU साठी प्रशिक्षक पल्लवी कल्हापुरे यांनी विशेष प्रयत्न केले.
✨ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल! ✨

उद्योजकता प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला . या दिवशी प्रमुख वक्ते स्वामी श्रीकंठानंद यांनी विध्यार्थ्यांना उद्योजकता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले व तसेच अंजनेरी गावच्या सरपंच मा. श्रीमती लांडे ताई याचे हि मार्गदर्शन लाभले .तसेच प्राचार्य श्री आर आर देशमुख साहेब व संस्थेतील गटनिदेशक श्री एस यु काळे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संविधान मंदिर लोकार्पण सोहळा अनुषंगाने संविधान आठवडा साजरा करून अनुषंगाने रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजन केले.
Institute level Techinical Exhibition 2025
Fitter students got 2nd prize at Institute Level Technical Exhibition Under the Guidance of Mrs. Rahul Deshmukh sir & Miss Pallavi kalhapure madam & Mrs Gawit Sir
District level Technical Exhibition Prize Distribution 2025
our fashion design and technology students got 3 rd prize at district level Technical Exhibition. Under the Guidance of principal shri. Rahul Deshmukh Sir, & Instructor Mrs. Arachna more madam.

Traditional Games State level prize distribution ceremony By Hon.Minister Mahajan saheb And Lodhha Saheb


स्वच्छ सिंहस्थ कुंभ अभियान
दादासाहेब फाळके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांचा आदर्श उपक्रम 🙏
कुंभमेळा आयुक्त, नाशिक यांच्या कार्यालयाकडून प्राप्त मार्गदर्शक पत्राच्या अनुषंगाने
तसेच त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली,
स्वच्छ सिंहस्थ कुंभ अभियानांतर्गत दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी
सकाळी 8.00 ते 10.30 या वेळेत विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेत
दादासाहेब फाळके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
यांचा उत्स्फूर्त, शिस्तबद्ध व जबाबदार सहभाग लाभला.
या उपक्रमास
🔹 माननीय विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम साहेब
🔹 माननीय कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह साहेब
🔹 माननीय तहसीलदार, त्र्यंबकेश्वर गणेश जाधव साहेब
🔹 नवनिर्वाचित नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार मॅडम
🔹 विविध आखाड्यांचे साधू-महंत
यांचे मोलाचे मार्गदर्शन, उपस्थिती व आशीर्वाद लाभले.
या स्वच्छता मोहिमेत
➡️ 105 विद्यार्थी
➡️ 15 स्टाफ सदस्य
यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून स्वच्छता कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी गव्हर्मेंट पार्किंग परिसर तसेच खंडेराव महाराज मंदिर समोरील रस्ता स्वच्छ करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी दोन ट्रॉली कचरा संकलित करून तो पुढील योग्य विल्हेवाटीसाठी
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या स्वाधीन केला.
मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात आली.
स्वच्छता कार्यापूर्वी विद्यार्थ्यांना
🧤 हॅन्ड ग्लोज | 👕 टी-शर्ट | 🧢 कॅप | 😷 मास्क
तसेच आवश्यक स्वच्छता साहित्य वाटप करण्यात आले.
स्वच्छता कार्यानंतर सहभागी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी
☕ चहा व नाश्त्याची योग्य व्यवस्था करण्यात आली होती.
या उपक्रमासाठी संस्थेचे
प्राचार्य श्री. आर. आर. देशमुख
तसेच संस्थेतील स्टाफ —
चांदगुडे सर, मोरे मॅडम, कल्हापूरे मॅडम, क्षत्रिय मॅडम, सोनवणे सर, भगरे मॅडम, मस्के मावशी व ब्राह्मणे मावशी
हे सर्व उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
गोदावरी नदीपात्र व परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी,
स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने
हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी व अनुकरणीय ठरला.
🌱 स्वच्छ शहर – सुंदर शहर
🌱 स्वच्छ कुंभ – निरोगी समाज
या उपक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल
कुंभमेळा आयुक्त कार्यालय, नाशिक,
त्र्यंबकेश्वर नगरपरिषद,
विविध आखाड्यांचे साधू-महंत तसेच सर्व मान्यवरांचे
दादासाहेब फाळके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक)
यांच्यावतीने मनःपूर्वक आभार.
📸 सोबत या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.
आज दिनांक 08/01/26 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्रंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथे .
Sofy company मार्फत sofy Sampling Activity चे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमासाठी Sofy Team चे प्रतिनिधी गगन मॅडम, रंजीत सर उपस्थित होते.
तसेच प्राचार्य श्री आर. आर. देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच Staff – मोरे मॅडम, कल्हापुरे मॅडम, क्षत्रिय मॅडम, भगरे मॅडम, ब्राह्मणे मावशी, पवार मावशी, म्हस्के मावशी यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाअंतर्गत संस्थेतील सर्व मुली प्रशिक्षणार्थींना Sofy उत्पादनांचे नमुने वाटप करण्यात आले.
तसेच महिलांचे आरोग्य व स्वच्छता याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व त्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
मुली प्रशिक्षणार्थींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला